• +91-7722046271

Blogs

12/06/2024
Ashwini Bulakh

नामांकनाची कार्यपद्धती

प्रत्येक सहकारी गृहनिर्माण संस्थेमधील सभासदांनी नामांकनाच्या महत्त्वाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. नामांकनाचा सहकारी कायद्यामध्ये नियम क्रमांक २५ व २६ नुसार तसेच उपविधीमध्ये क्रमांक ३२ ते ३७ नुसार समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक सभासदाने आपली सदनिका तथा आपल्या स्थावर मालमत्तेचा वारसदार नामांकनाद्वारे निश्चित करावयाचा असून तशी नोंद आपल्या संस्थेच्या दप्तरी असणे अनिवार्य करण्यात आले आहे. याचे महत्त्व व गांभीर्य विचारात घेऊन लेखापरीक्षकांनी दरवर्षी संस्थेला द्यावयाच्या लेखापरीक्षण अहवालात याची माहिती देण्याची तरतूद करण्यात आली आहे. नामांकन केलेली किंवा केलेल्या व्यक्तींनी केवळ विश्वस्त म्हणूनच आपली कामे व जबाबदाऱ्या पार पाडावयाच्या असतात.

नामांकनाची कार्यपद्धती :

नामांकनपत्राचे विहित नमुन्यातील अर्ज तीन प्रतींमध्ये हाऊसिंग फेडरेशन तथा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संघाच्या कार्यालयात उपलब्ध होतात. असे नामांकन अर्ज व्यवस्थितपणे व परिपूर्ण भरून तसेच त्यावर सभासदांनीच स्वत:ची सही करून संस्थेच्या सचिव किंवा अध्यक्षांकडे द्यावयाचे असतात. तीन प्रतींपकी तिसऱ्या प्रतीवर सचिव किंवा अध्यक्ष अर्ज प्राप्त झाल्याबद्दल सही करून व संस्थेचा शिक्का मारून सभासदाला परत करतात. सभासदाने नामांकन करून दिलेला अर्ज नाकारण्याचा अधिकार व्यवस्थापक समितीला असत नाही. त्यामुळे असा अर्ज व्यवस्थापक समितीच्या मंजुरीसाठी व आवश्यक नोंदी करण्यासाठी लगतच्या व्यवस्थापक समितीच्या सभेपुढे अथवा सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात येतो. मंजुरीअंती सभेची दिनांक व ठराव क्रमांक संस्थेकडे सभासदाने दिलेल्या दोन्ही प्रतींवर नोंदविण्यात येतो. तद्नंतर दुसऱ्या क्रमांकाची प्रत संस्थेच्या सचिव तथा अध्यक्ष यांच्या सहीने व संस्थेचा शिक्का उमटवून सभासदाला देण्यात येते व एक प्रत सभासदाची सही घेऊन संस्थेच्या दप्तरी ठेवण्यात येते. त्यामुळे, नामांकन अर्जाच्या तिन्ही प्रतींवर समान माहिती (एकच मजकूर) लिहिली गेली असेल हे पाहण्याची काळजी सभासदाने घ्यावयाची आहे.

पहिल्या नामांकन नोंदणीसाठी शुल्क आकारण्यात येत नाही. मात्र त्यापुढील प्रत्येक नवीन नामांकनासाठी वरील कार्यपद्धतीनुसार बदल करावयाचे असल्यास प्रत्येक वेळी शंभर रुपये इतके अतिरिक्त शुल्क आकारण्यात येते. म्हणजेच, सभासदाला नामांकनात बदल करण्याचा व पूर्वीचे नामांकन रद्द करण्याचा अधिकार आहे. अंतिम नामांकन ग्रा धरण्यात येते. नामांकनाच्या संदर्भात अधिक माहिती उपविधीतील क्रमांक ३२ व ३३ मध्ये विस्तृतपणे देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सभासदाच्या पश्चात त्याने दिलेल्या नामांकनानुसार वारसदाराचे मालमत्तेमधील हितसंबंध व अधिकार वारसदार या नात्याने नामांकन केलेल्या व्यक्तीच्या नावे संस्थेच्या व्यवस्थापक समितीने हस्तांतरित करावयाचे असतात. या संदर्भामध्ये सविस्तर माहिती व उपविधी क्रमांक ३४ मध्ये नमूद करण्यात आली आहे. ज्याच्या नावे नामांकन केलेले आहे अशा व्यक्तीने विश्वस्त या नात्याने मूळ सभासदाच्या पश्चात विहित मुदतीत मालमत्ता हस्तांतरणाचा प्रस्ताव संस्थेकडे विहित नमुन्यात सभासद वर्गणी व हस्तांतरण शुल्क यांच्या धनादेशासह संस्थेच्या सचिवांकडे किंवा अध्यक्षांकडे द्यावयाचा असतो.

एखादा सभासद नामनिर्देशन न करताच दिवंगत झाल्यास अशा सभासदाचे मालमत्तेमधील भाग व हितसंबंध हस्तांतरण करण्याबाबत संस्थेच्या सूचनाफलकावर सूचना लिहिण्यात येते. तसेच जास्त खपाच्या कमीत कमी दोन स्थानिक वृत्तपत्रांमधून याबाबतची माहिती प्रसिद्ध करून हक्क, हरकती, मागण्या संस्थेच्या वतीने मागविण्यात येतात. मात्र याचा खर्च संबंधित मालमत्ता धारकाच्या नावे टाकण्यात येतो. त्या अनुरोधाने प्राप्त होणारे हक्क, सूचना, आक्षेप व मागण्या विचारात घेऊन तसेच उपविधी क्रमांक १७ (अ) आणि क्रमांक १९ मधील तरतुदींना अधीन राहून योग्य व्यक्तीला संस्थेमधील त्या सदनिकेच्या किंवा मालमत्तेच्या संदर्भात सभासदत्व देण्यास पात्र ठरविण्यात येते. या संदर्भामधील सविस्तर माहिती उपविधी क्रमांक ३५, ३६ व ३७ मध्ये नमूद करण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यातील दुष्परिणाम विचारात घेऊन व नामनिर्देशनाचे महत्त्व सर्व सभासदांनी जाणून घेऊन वेळीच नामनिर्देशन पत्रे भरून स्वतच्या सहीने आपल्या संस्थेकडे देणे उचित ठरेल.

संस्थेच्या सभासदत्वासंदर्भातील पात्रता तसेच सभासदत्वाच्या शर्ती त्याचप्रमाणे नामांकनाद्वारे मिळणाऱ्या सभासदत्वाविषयी उपविधीतील तरतुदींचा आधार घ्यावा. याव्यतिरिक्त सदनिका खरेदी-विक्रीच्या नोंदणीकृत करारनाम्याच्या व्यवहारांमधून किंवा नोंदणीकृत बक्षीसपत्राद्वारेसुद्धा पात्र व योग्य व्यक्तीला सहकारी संस्थेचे सभासदत्व प्राप्त होऊ शकते. त्यासाठी संस्थेला भरून द्यावयाच्या अर्जाचे बंधपत्रांचे व करारपत्रांचे नमुने जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. अशा अर्जासोबत सभासद वर्गणी तसेच हस्तांतरण शुल्क व शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेला अधीन राहून अधिमूल्य (ट्रान्स्फर प्रीमियम) रेखांकित धनादेशाद्वारे संस्थेकडे द्यावयाचे असते. या संदर्भामध्ये उपविधी क्रमांक ३८मध्ये सविस्तर दिलेली आहे. तथापि खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत संस्थेचे सभासदत्व घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीने अधिक जागरूक राहून कशी व कोणती काळजी घ्यावी हे पुढील भागात पाहू.

13/06/2024
Ashwini Bulakh

सौ. अश्विनी प्र. बुलाख ह्यांचे मार्गदर्शन

प्रजासत्ताक दिना निमित्त, सौ. अश्विनी प्र. बुलाख ह्यांचे बाल विकास शाळा, बदलापूर येथे मार्गदर्शन

नमस्कार!
माझ्या आदरणीय गुरुजनांना, मान्यवरांना, आणि माझ्या प्रिय विद्यार्थ्यांना हृदयपूर्वक शुभेच्छा!

आज आपण सर्वजण आपला 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी इथे जमलो आहोत. आपल्या देशाच्या या महान दिवसाचे महत्त्व शब्दांत मांडणे कठीण आहे. आजचा दिवस म्हणजे आपल्या संविधानाचा सन्मान करण्याचा, आपल्या हक्कांबरोबर कर्तव्यांची आठवण ठेवण्याचा दिवस आहे.

यावेळी, मी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विशेष आभार मानतो. त्यांच्याशिवाय हे संविधान तयार होणे अशक्य होते. बाबासाहेबांनी आपल्याला केवळ हक्क दिले नाहीत, तर कर्तव्यांची जाणीव करून दिली. त्यांनी प्रत्येक भारतीयाला समानतेचा अधिकार दिला, जिथे धर्म, जात, भाषा यापलीकडे जाऊन आपली एक ओळख – भारतीय अशी झाली. आज आपण त्यांचे आभार मानून त्यांच्याप्रती कृतज्ञ राहायला हवे.

मित्रांनो, आपण सगळे पाहतोय की आपल्या देशाचा विकास झपाट्याने होत आहे. अनेक क्षेत्रांत आपण जगाला नवी ओळख देतोय.

1. चांद्रयान-३चे यश:
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (ISRO) चांद्रयान-३च्या यशाने भारताला जागतिक पातळीवर विशेष स्थान मिळवून दिलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग करणारा भारत पहिला देश आहे. हे फक्त एक यश नाही, तर आपल्या विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीचा पुरावा आहे.

2. डिजिटल क्रांती:
आपल्या देशातील डिजिटल इंडिया मोहिमेमुळे आज प्रत्येक गाव, प्रत्येक व्यक्ती इंटरनेटशी जोडली गेली आहे. UPI आणि डिजिटल पेमेंट्समुळे व्यवहार सोपे झाले आहेत. आज भारत डिजिटल व्यवहारांमध्ये आघाडीवर आहे, ज्यामुळे देशाचा आर्थिक विकास वेगाने होत आहे.

3. आत्मनिर्भर भारत:
आपण आज स्वावलंबनाच्या दिशेने प्रगती करत आहोत. कोरोना काळात आपण स्वतःच्या लसी निर्माण करून दाखवल्या. “मेक इन इंडिया” मोहिमेमुळे देशात उत्पादन क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. वाहनं, इलेक्ट्रॉनिक्स, संरक्षण साहित्य – आपण स्वतः निर्माण करत आहोत.

4. युवक आणि स्टार्टअप्स:
भारत हा आता जगातील तिसऱ्या क्रमांकाचा स्टार्टअप इकोसिस्टम बनला आहे. तरुणांच्या कल्पकतेने आणि मेहनतीने नव्या उद्योगांना आकार दिला आहे. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत.

5. पर्यावरण आणि सौरऊर्जा:
हरित ऊर्जा, सौरऊर्जा प्रकल्प आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये आपण मोठी झेप घेतली आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेला “मिशन लाइफ” (Lifestyle for Environment) हा उपक्रम लोकांना टिकाऊ जीवनशैलीकडे घेऊन जातो.

6. महिला सबलीकरण:
महिलांना सक्षम बनवण्यासाठी विविध योजना लागू केल्या जात आहेत. स्वयंपूर्ण महिलांमुळे देश अधिक सक्षम होईल, यावर आपला भर आहे.

मित्रांनो, हा प्रगतीचा प्रवास थांबणार नाही. परंतु ही प्रगती यशस्वी होण्यासाठी आपल्याला सर्वांनी एकत्र काम करायला हवे. आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवली पाहिजे. शिक्षण, तंत्रज्ञान, पर्यावरण, आणि समाजसेवा या प्रत्येक क्षेत्रात आपलं योगदान असलं पाहिजे.

आजच्या दिवशी, मी तुम्हाला सांगू इच्छितो की – देशासाठी छोट्या-छोट्या गोष्टीतूनही मोठा बदल घडवता येतो. कचरा व्यवस्थापन, पाण्याचा योग्य वापर, मुलींना शिक्षणाचा हक्क, आणि देशातील शांतता राखणे – हे सगळं आपण करू शकतो.

आणि याच भावनेला माझ्या मनातील चार ओळी समर्पित करतो:
“शिकूया, मोठी स्वप्न पाहूया,
देशासाठी झोकून देऊया,
प्रत्येक कृतीत असे देशभक्ती,
भारतास नेऊया प्रगतीच्या वाटेवरती.”

शेवटी, मला बाबासाहेबांचे एक वाक्य आठवतं:
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.”
हे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.

चला, या प्रजासत्ताक दिनी आपण नव्या संकल्पांसह एकजुटीने पुढे जाण्याचं वचन देऊया. आपला भारत अधिक प्रगत, समृद्ध, आणि सामर्थ्यवान होवो, हीच माझी शुभेच्छा आहे.

सौ. अश्विनी प. बुलाख,
संचालिका,
ऍबसॉकप्रो 

13/06/2024
Ashwini Bulakh

We Have Top Executive and Start Up Here Event 2023

Single stroke at the present moment and yet I feel that lorem quis bibendum auctor.

13/06/2024
Ashwini Bulakh

Chances are Good That There’s a Cloud Software as

Single stroke at the present moment and yet I feel that lorem quis bibendum auctor.


15/06/2024
Ashwini Bulakh

Chances are Good That There’s a Cloud Software as

Single stroke at the present moment and yet I feel that lorem quis bibendum auctor.